उत्तर सोलापूर: रविवार पेठेत रस्त्यावर झालेल्या वादातून युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; 6 जणांविरुद्ध जेलरोड पोलिसात गुन्हा...
सोलापूर शहरातील रविवार पेठ येथे रस्त्यावर थांबलेल्या युवकाला बाजूला जाऊन थांबण्यास सांगण्याचा वाद प्रचंड हिंसक रूपात बदलला. रविवार पेठेतील प्रकाश टेलर दुकानासमोर 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत जखमी झालेल्या श्रीनिवास दत्तात्रय मंजेली (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागेश मंठाळकर, अनिल विटकर, श्रीनिवास मुदगल, राजू जाधव, धीरज बंदपट्टे, राहुल मुदगल यांच्या विरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.