चंद्रपूर: पांढरकवढा येथे प्रेम प्रकरणातून एका तरुण युवकाला चाकूने भोसकले ; आरोपी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात
घुग्घूस येथून चार किमी अंतरावर असलेल्या पांढरकवढा येथे प्रेम प्रकरणातून एका तरुण युवकाला चाकूने भोसकल्याची घटना आज दि. 14 सप्टेंबर ला सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान पांढरकवढा येथे घडली.माहितीनुसार आरोपी व जखमी युवकाचे आमरासमोर घर असून प्रेम प्रकरणाच्या वादा वरुन आरोपीनी अनेक वेळा त्या युवकाला समजविण्याचा प्रयत्न केला परंतु तो युवक कानाडोळा करीत होता.