जिल्हा परिषद लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय संवाद मेळावा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ सभागृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर उपस्थित होते. कार्यक्रमात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर, वेतन त्रुटींविषयी शंका, जुनी पेन्शन योजना तसेच संघटनात्मक विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी समाधानकारक उत्तरे देत मार्गदर्शन केले.