जालना: खोटे गुन्हे दाखल करणारे पी.आय.संतोष साबळेना निलंबित करा-ॲड.ब्रह्मानंद चव्हाण,आर.पी.आय.महाराष्ट्र संघटक चमन येथे मागणी
Jalna, Jalna | Jul 1, 2026 आज दिनांक एक जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील चमन येथे ॲड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मागणी केली आहे की जालना शहरातील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी माझ्यावर एका जमिनी प्रकरणांमध्ये खोटा गुन्हा दाखल केला असून माझ्या मुलावरही खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी माझा सीडीआर तपासावा व माझी योग्य चौकशी करावी तसेच पीआय साबळेंना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.