जालना: अल्पवयीन मुलीच्या खुनप्रकरणी वडील व चुलत्याला जन्मठेप; जालना न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Jalna, Jalna | Apr 11, 2026 अल्पवयीन मुलीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडील व चुलत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत मा.जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.शनिवार दि.11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पिरपिंपळगाव शिवारातील भातखेडा परिसरातील असून न्यायालयाने आरोपी संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना दोषी ठरवले. 13 डिसेंबर 2022 रोजी घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान मिळाली.आरोपींनी त्यांच्या 17 वर्षीय मुलीचा खून केला होता.