अंजनगाव सुर्जी: लग्नाचे आमिष देऊन युवतीचा लैंगिक छळ;आरोपीला अटक,अंजनगाव सुर्जी पोलिसांची कारवाई
लग्नाचे आमिष देऊन युवतीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपीला अटक करुन आज दुपारी २ वाजता न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.अभिषेक तायडे,असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तालुक्यातील एका गावखेड्यातील युवती २०१८/१९ रोजी कापुसतळणी येथे शिक्षणासाठी ये-जा करीत होती.याचदरम्यान अभिषेक न.तायडे याने तिला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले.त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला.काही दिवसांनी ती विवाह करून आपल्या पतीसोबत सासरी निघून गेली.