मोहाडी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातात कुशारी येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहाडी-कुशारी मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने पाठीमागून धडक दिल्याने ही घटना घडली. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी विठ्ठल मल्लेवार (वय ५३, रा. कुशारी) आणि त्यांचे मित्र सुनिल भैयालाल पशिने (वय ५२, रा. कुशारी) हे नेहमीप्रमाणे जेवणानंतर कुशारी ते मोहाडी रोडने फिरून गावाकडे परत जात होते. दरम्यान, मोहन साकुरे यांच्या शेताजवळ, आरोपी विक्की....