तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथे आज दि. 19 जानेवारी रोज सोमवारला दुपारी 1 वा. तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन भंडारा जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी, दिलीप सार्वे,संदीप ताले, पंचायत समिती उपसभापती सुभाष बोरकर, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांच्यासह परिसरातील मान्यवर तसेच तालुक्यातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.