जळगाव: जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली; रोहन घुगे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी
राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहन घुगे हे यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातून मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हे आदेश निर्गमित केले आहेत. या बदल्यांमुळे जळगाव जिल्ह्याला आता नवे प्रशासकीय प्रमुख मिळाले आहेत.