अलिबाग: खोपोलीत धक्कादायक प्रकार, शाळकरी मुलगी रिक्षा चालवताना कॅमेऱ्यात कैद
Alibag, Raigad | Nov 10, 2025 खोपोली शहरात सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगी स्वतः रिक्षा चालवताना दिसत असून, रिक्षाचा चालक तिच्या बाजूला बसलेला दिसत आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे. सदर व्हिडिओ फेसबुकवर डॉ. रियाज पठाण या युजर आयडीवरून अपलोड करण्यात आला असून, काही तासांतच तो व्हायरल झाला आहे.