अकोला: खोट्या मेसेजपासून सावध राहा — मनपा प्रशासनाचा इशारा
Akola, Akola | Nov 7, 2025 अकोला, दि. ७ नोव्हेंबर : “पाईपलाईन डिस्कनेक्ट होईल” अशा आशयाचा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून अकोला महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. मनपा प्रशासनाने स्पष्ट केले की, अशा प्रकारचा कोणताही मेसेज मनपाकडून पाठविण्यात आलेला नाही. नागरिकांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर UPI द्वारे पाणी कराचा भरणा करू नये. ऑनलाईन भरणा फक्त अधिकृत संकेतस्थळ https://amcwaterbill.org वरूनच करावा, असे आवाहन दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले