समुद्रपूर: परडा शेत शिवारात रस्त्याच्या बाजूला उभी असलेली शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरुन; समुद्रपूर पोलिसांत गुन्हा
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गावरील परडा शेत शिरात रस्त्याच्या बाजूला उभी ठेवून असलेली शेतकऱ्याची दुचाकी २३ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची माहिती आज २४ जुलै रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वासुदेव महाकाळकर यांनी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३२ ए.पि.५९२६ रस्त्याच्या कडेला उभी ठेवून ते शेतात गेले असता कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रारी त्यांनीदिली आहे.