ठाणे: 30 सप्टेंबर रोजी मुंब्रा वाहतूक कार्यालयावर शरद पवार गटाचे आंदोलन, शरद पवार गटाचे कौसा वॉर्ड अध्यक्ष जावेद शेख
Thane, Thane | Sep 27, 2025 मुंब्रा येथे वाहतुकीची मोठी समस्या आहे. अनेक दिवसांपासून ही समस्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या वतीने येत्या मंगळवारी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी मुंब्रा वाहतूक कार्यालयावर आंदोलन आयोजित केलं आहे अशी माहिती मुंब्रा येथील शरद पवार गटाचे कौसा वॉर्ड अध्यक्ष जावेद शेख यांनी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास दिली आहे. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.