जालना: महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांचा पत्रकारांच्या चित्रीकरणाला विरोध? नागरिकांमध्ये चर्चांना उधाण
Jalna, Jalna | May 5, 2026 जालना - जालना महानगरपालिकेत नव्याने रुजू झालेल्या आयुक्त अजली शर्मा या अद्यापही माध्यमांसमोर सविस्तरपणे आलेल्या नसल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. शहरातील मूलभूत सुविधा, विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी समस्यांवर कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार, याबाबत नागरिकांना अपेक्षा असताना आयुक्त अंजली शर्मा यांनी अद्याप माध्यमांशी संवाद साधलेला नाही, अशी चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेत विविध बैठका घेतल्या जात असल्या तरी पत्रकारांना चित्रीकरण आणि शूटिंग करण्यास विरोध दर्श