अकोला : शुभ प्रभात स्वरसाथी कराओके ग्रुपचे स्नेहमिलन २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता अभिरुची गार्डन येथे उत्साहात पार पडले. सरस्वती व गणेश पूजन हरीश अण्णा यांनी सहपत्नीच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. ग्रुपच्या तब्बल ४५ सदस्यांनी एकापेक्षा एक सुंदर गीते सादर करत वातावरण रंगतदार केले. स्नेहमिलनात आनंद, मैत्री आणि गायनाची सुरेल मैफिल अनुभवायला मिळाली.