नगर परिषद / नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 26) ला 4 वाजता घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी करून सुचना दिल्या.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गौडा यांनी नगर परिषद, घुगुस येथील ईव्हीएम मशीन ठेवायचा सुरक्षा कक्ष व जनता विद्यालय घुगुस येथील आठ मतदान केंद्राची पाहणी केली.