माहूर: सारखणी येथे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या बॅनरच्या फोटोला प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
Mahoor, Nanded | Nov 3, 2025 आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान नांदेड जिल्हयातील माहुर तालुक्यातील सारखणी येथे मंत्री संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले .. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सारखणी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दुर्लक्ष केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे .. बंजारा समाजाने संजय राठोड यांचा निषेध करत संजय राठोड त्यांच्या फोटोच्या बॅनरला प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून संताप व्यक्त केला .