गेल्या १५ ते २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शंकर राठीया मेहता (वय १७) या तरुणाचा मृतदेह बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारा जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण मूळचा मध्यप्रदेशातील असून, कुटुंबासह मजुरीसाठी विटनेर येथे वास्तव्यास होता. याबात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.