वर्धा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वैश्विक पारायण समापन समितीच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांचे भव्य वैश्विक पारायण आयोजित करण्यात आले आहे. येत्या 11 जानेवारी 2026 रोजी शहरातील सर्कस ग्राऊंड परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. विश्वशांती, आत्मशांती आणि मन:शांतीच्या उद्देशाने आयोजित या पारायणामध्ये मोठ्या संख्येने भक्त सहभागी होणार असून, सर्व भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ह.भ.प. मयूर महाराज दरणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.