कोरेगाव: महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीचे कोरेगावात प्रशासनाला निवेदन सादर
राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्याची परवानगी देण्याच्या सरकार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल जाणीवपूर्वक रजिस्ट्रेशन देत नाही. होमिओपॅथिक डॉक्टरांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीने केली आहे. समितीच्या कोरेगाव तालुका शाखेच्यावतीने सोमवारी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली.