28 ऑक्टोबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन थंडर अंतर्गत गणेश पेठ पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हंसा ट्रॅव्हल्स ऑफिस मध्ये छापा मार कार्यवाही करून तेथून वेगवेगळ्या कंपनीचे तंबाखू किंमत दोन लाख 16 हजार 9 68 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा माल आरोपी आशिष , सुरज यांच्या विक्री करता पाठविण्यात आला असल्याचे आरोपी आशिष पालकर यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.