गोंदिया : नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी लगतच्या ग्राम कारंजा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरच्या वतीने अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी घोषणा आणि फलकांच्या माध्यमातून सिकलसेल तपासणीचे महत्त्व पटवून दिले. गावातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली .