गेवराई: राक्षस भवन येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या नैराश्यातून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली
Georai, Beed | Oct 9, 2025 अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या विवंचनेतून गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. बंडू दगडू पोटफोडे (वय ३८, रा. राक्षसभुवन) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची चार एकर शेती होती. या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान त्यांना सहन झाले नाही. याच विवंचनेतून त्यांनी घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.