लिंबगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे दि 14 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री एकच्या सुमारास यातील आरोपी 1) सुधाकर सिरसाट 2) अकबर यांनी संगणमत करून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे कुलूप तोडून सिसिटिव्ही कॅमेरा फोडून 10 हजाराचे नुकसान करून चोरी करीत असताना मिळुन आले. याप्रकरणी फिर्यादी बॅंक व्यवस्थापक त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सातारे हे आज करीत आहेत.