तालुक्यातील साठवण तलाव अचानक फुटला, परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
Beed, Beed | Sep 16, 2025 बीड तालुक्यातील वासनवाडी येथील साठवण तलाव अचानक फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साठवण तलाव फुटल्याने शेतातील सोयाबीन, बाजरी, तुर तसेच इतर हंगामी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक पाण्याखाली गेल्याने त्यांचा जीवितहानीचा प्रश्न नसला तरी आर्थिक फटका मात्र जबरदस्त बसला आहे.