संगमनेर तालुक्यात वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने चोरी करणारे दोघे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दोघे ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात बारामती, निगडी, भोर, पुणे, पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.