चंद्रपूर: जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी केले जिल्ह्यातील चकपीपरी येथे पाल व चापले कुटुंबीयांचे सांत्वन
चकपीपरी येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पाल कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुःखाच्या या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आज दि 22 ऑक्टोबर12 वाजता पाल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले.