माण: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा धडाकेबाज निर्णय; पदोन्नतीचे टप्पे कमी केल्याने जिल्हा परिषद लिपीकांना मिळाला न्याय
Man, Satara | Oct 1, 2025 ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे शिवधनुष्य हाती उचललेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता मंत्रालयात विशेष बैठक घेऊन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पदोन्नतीमधील टप्पे कमी केल्याने जिल्हा परिषद लिपीकांना पुढील पदाची वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे. जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे.