महाड: निसर्गाचा स्वच्छता दूत गिधाड नष्ट होण्याच्या मार्गावर…@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 17, 2025 निसर्गाचा स्वच्छता दूत म्हणून ओळख असलेलं गिधाड आज गंभीर संकटात आहे. एकेकाळी शेतबांधावर आणि डोंगरकड्यावर सहज दिसणारा हा पक्षी आता मोजक्या ठिकाणीच आढळतो. औषधांचा अतिरेकी वापर, अधिवास नष्ट होणं आणि अन्नसाखळीतील बदल ही त्याच्या घटतीची प्रमुख कारणं आहेत.