आर्टिलरी सेंटर रोड परिसरात दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवून ७४ वर्षीय महिलेकडून सुमारे २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. विजया पुनमचंद ठोळे (वय ७४, रा. स्वाती बंगला, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) या महिला ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास देवदर्शनासाठी जात असताना, दोन इसमांनी “आम्ही पोलीस आहोत, आमचे मोठे साहेब बोलवत आहेत” असे सांगून त्यांना रस्त्याच्या कडेला नेले. त्यानंतर हातचलाखी करून गळ्यातील २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चोरून नेले