जालना: जालन्यात जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस दलाचा 'संडे ऑन सायकल' उपक्रम...:अपर पोलीस अधीक्षक, विक्रम साळी,
Jalna, Jalna | Jun 7, 2026 जालन्यात जागतिक सायकल दिनानिमित्त जालना पोलीस दलातर्फे 'संडे ऑन सायकल' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'फिट इंडिया' अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीला शहरातील महात्मा गांधी चौक येथून सुरुवात झाली. विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात दाखल झाली, जिथे तिचा समारोप करण्यात आला. या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत