जिंतूर: कुऱ्हाडी येथील तलावात दहेगाव येथील युवकाचा बुडून मृत्यू ; एन.डी.आरएफ पथकाने शोधला मृतदेह
कुऱ्हाडी गावामध्ये दोन दिवसापूर्वी दोन बहिणी धुणे धुण्यासाठी गेल्या असताना पाय घसरून तलावात पडल्यामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज रविवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दहेगाव येथील युवक सिद्धार्थ वाकळे वय ३५ वर्ष हा युवक पोहण्यासाठी तलावात उतरलं पोहत असतांना अचानक युवक तलावात बुडाल, एन.डी.आर. एफच्या पथकाने व ग्रामस्थांनी तलावात 4 ते 5 तास शोध मोहीम राबवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.