जालना: जालना महानगरपालिकेला अखेर पूर्णवेळ आयुक्त; नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांची नियुक्ती
Jalna, Jalna | Apr 2, 2026 जालना महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या आयुक्त पदावर अखेर राज्य शासनाने पूर्णवेळ नियुक्ती करत प्रशासनाला दिलासा दिला आहे. गुरुवार दि. 2 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी गुरुवारी या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले. अंजली शर्मा या 2021 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, यापूर्वी त्या नंदुरबार येथे होत्या.