राज्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करून विधाथ्र्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आता राज्यातील अंगणवाडींचे हायटेक रूपांमर करण्यात येणार आहे. अंगणवाडी स्मार्ट होणार असून या योजनेमध्ये जिल्ह्यातील 106 अंगणवाडीचा समावेश असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.