मानगाव: माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे नेते अंकुश उंडरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
Mangaon, Raigad | Nov 12, 2025 आज बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथील गीताबाग येथे माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे नेते अंकुश उंडरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष या नात्याने अंकुश उंडरे यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच रायगड मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भागातील विविध प्रश्नांची माहिती दिली. त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.