माजलगाव: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विश्वासू समर्थकावर सावरगाव शिवारात प्राण घातक हल्ला
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर यांच्यावर सावरगाव परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पवन कंवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे तीन साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. पवन कंवर व त्यांचे साथीदार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळील एका धाब्यावर जेवण करत होते.