जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या वकिलांच्या गाड्या पोलिसांनी कोर्टाच्या आवारातून जप्त केल्याने वकील आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या 'दडपशाही' विरोधात स्थानिक वकील संघटनेने आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवला आहे. दरम्यान आता गाड्या कुठे पार्क करायचा असाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाहेर आज जोरदार नारेबाजी करण्यात आली.