वर्धा: रुपालीताई चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली राज्य महिला आयोगाची जनसुनावणी
Wardha, Wardha | Sep 16, 2025 राज्य महिला आयोगाच्या 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जनसुनावणी सुरु करण्यात आली असून या जनसुनावणीसाठी एकून ४ पॅनल तयार करण्यात आले आहे. यापैकी एका पॅनलच्या अध्यक्ष स्वतः आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कामकाज पाहात आहे.