चोपडा: चोपडा शिरपूर रस्त्यावर हॉटेल जयेश च्या पुढे दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, तरुण ठार, चोपडा पोलिसात नोंद
चोपडा ते शिरपूर जाणाऱ्या रस्त्यावर चोपडा शहराच्या बाहेर हॉटेल जयेश आहे. या हॉटेलच्या समोर दुचाकी क्रमांक एम. एच.१८ बी. एस.८५८८ घेऊन तरुण हर्षल मधुकर नाथबुवा वय ३४ हा तरुण जात होता त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.