जालन्यात घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद; 5 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; रोख रक्कम व दागिने जप्त.. आज दिनांक 2 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली आहे. भारतसिंग कपूरसिंग बावरी (वय 26, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 5 घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.