सेलू: लोअर दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग, सेलू राजवाडी रस्ता बंद
Sailu, Parbhani | Oct 30, 2025 सेलू जवळील ब्रह्मवाकडी येथील लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता १० दरवाजातून ६ हजार ७५० इतका विसर्ग दुधना नदी पात्रात सुरू आहे. धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सेलू राजवाडी ब्राह्मणगाव मार्गे वालूर रस्ता बंद पडला आहे.