नशिराबाद येथे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्रीसाठी घरात मिळून आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८० किलो मांस जप्त केले आहे.