अलिबाग: सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांचा एल्गार
एक दिवस सेवा बंद आंदोलन
Alibag, Raigad | Sep 18, 2025 ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या रुग्णसेवेवर अन्याय करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात गुरूवारी ( दि.18) डॉक्टरांनी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवस सेवा बंदचा नारा दिला.संघटना संपावर गेल्याने रायगड जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडला होता.