केज: कीज ठाणे हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार, अत्याचार, पॉक्सो तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गंभीर गुन्हे दाखल
Kaij, Beed | Oct 16, 2025 बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक अत्यंत खळबळजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका सवर्ण समाजातील तरुणाने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दहा वर्षांपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.या नराधमाविरोधात बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.