बार्शीटाकळी: बार्शीटाकळीत हरभऱ्यावर ‘मर’ रोगाचा धोका; बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन!
बार्शीटाकळीत हरभऱ्यावर ‘मर’ रोगाचा धोका; बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन बार्शीटाकळी परिसरात सततच्या पावसामुळे जमिनीत ओल वाढल्याने हरभऱ्यावरील ‘मर’ या बुरशीजन्य रोगाचा धोका वाढला आहे. हा रोग फ्युजारियम ऑक्सिसफोरम बुरशीमुळे होत असून एकदा पिकावर आल्यास नियंत्रण कठीण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे. विजय, विराट, विशाल, जॅकी ९२१८ हे रोगप्रतिकारक वाण वापरावेत.