ऊस वाहतूक करणाऱ्या २ ट्रॉलीचे ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री साडेआठ वाजता गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटीजवळ घडली. राज विजय पाळंदे (वय २२, रा. वरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.