चंद्रपूर: गंजवार्ड येथे अवैधरित्या पिस्टल, देशी कट्टा व खंजर सारख्या घातक हत्यार बाळगणाऱ्या चौद्यांविरुध्द कारवाई
.पो.स्टे. चंद्रपूर शहर पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार छोटु सुर्यवंशी हा आपल्या साथीदारासह काळया रंगाच्या डस्टर कारने दादामिया ट्रॉन्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळी जागा, गंजवार्ड चंद्रपूर येथे देशी कट्टा घेवुन येणार आहे. अशा खात्रीशिर माहितीवरून काल दि.२० ऑक्टोबर ला सायंकाळी ६ वाजता चंद्रपूर शहर येथील पोलीस निरीक्षक हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पंचासह सदर ठिकाणी सापळा रचुन सदर ठिकाणी उभ्या असलेल्या काळया रंगाचे वाहनासह आरोपींना अटक केली.