जालना: बालकामगाराच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण! मत्स्योदरी स्टील कंपनीसह पोलीस, कामगार व बाल संरक्षण यंत्रणांना नोटीस
Jalna, Jalna | Jun 19, 2026 जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील मत्स्योदरी स्टील कंपनीमध्ये काम करत असताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या अल्पवयीन बालकामगाराच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात कंपनी व्यवस्थापन, पोलीस विभाग, कामगार विभाग,महिला व बालविकास विभाग, बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण यंत्रणांना नोटीस बजावत आयोगाला प्राप्त तक्रारीवरून नोटीस आणि न्यायिक सुनावणी जाहीर केली आहे.