महाड एमआयडीसी परिसरात महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी काही बेपत्ता महिलांचा शोध लागला असला तरी काही प्रकरणे अद्यापही अनुत्तरित आहेत. अशातच महाड तालुक्यातील नडगाव येथून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नवी घटना समोर आली आहे. नडगाव संतोष नगर येथे वास्तव्यास असलेली सुंदरी अनुप हिरा (वय 19, मूळ राहणार – कलकत्ता, पश्चिम बंगाल) ही तरुणी 15 जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली होती.