औंढा नागनाथ: येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात काकडा भजन आरतीची सांगता,भजनी मंडळीचा केला सत्कार
औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात मागील महिनाभरापासून दररोज सकाळी पाच ते आठ वाजे दरम्यान सुरू असलेल्या काकडा भजन आरतीची दिनांक आठ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजता भजनी मंडळीचा मंदिर संस्थांच्या वतीने सत्कार करत सांगता करण्यात आली. यावेळी मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ,गार्ड प्रमुख बबन सोनूणे,माजी सहसचिव उत्तमराव देशमुख, कडोजी पाटील, निळकंठ देव, गिरीश इखे ,बाबाराव येळणे, मारोती पाटील यांच्यासह भजनी मंडळीची उपस्थिती होती